टिप्परने पंधरा वर्षीय कामगाराला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 16:03 IST2021-05-27T16:02:19+5:302021-05-27T16:03:03+5:30
Malkapur News : टिप्परने पंधरा वर्षीय कामगाराला चिरडल्याची घटना धिरणी येथे घडली.

टिप्परने पंधरा वर्षीय कामगाराला चिरडले
मलकापुर: टिप्परने पंधरा वर्षीय कामगाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील घिरणी शिवारात गुरूवारी २७ मे रोजी रोजी पहाटे सहा वाजता घडली.
पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. घिरणी शिवारात उमाळीनजीक खदानीत अविनाश गोपाल गुंजाळ (वय १५) रा. घेरडी तालुका देऊळगाव राजा हा मशिनी जवळ झोपला होता. गुरूवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास खदानीत रिव्हर्स घेणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच २१ बी एच १७९३ च्या चालकाने त्याला चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी बालाजी मायनिंग कंपनीचा टिप्पर चालक श्रीकृष्ण शंकर कुरळकर (वय ३०) यास अटक केली व त्याच्या विरुद्ध कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.