ट्रक-कार अपघातात तिघे ठार तिघे गंभीर, धुळे येथील सिंधी समाजातील कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 10:59 PM2018-01-21T22:59:44+5:302018-01-21T22:59:55+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली.

Three seriously injured in truck-car crash Three families of Sindhi community in Dhule | ट्रक-कार अपघातात तिघे ठार तिघे गंभीर, धुळे येथील सिंधी समाजातील कुटुंब

ट्रक-कार अपघातात तिघे ठार तिघे गंभीर, धुळे येथील सिंधी समाजातील कुटुंब

googlenewsNext

बुलडाणा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरून अकोला जात होते.

धुळे येथील सिंधी समाजातील कुटूंब अकोला येथे रात्री ९ वाजेदरम्यान एमएच-०४- ए.आर. ४७०५ क्रमांकाच्या व्हॅगनार कारने येत होते. मलकापूर तालुक्यातील तालसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणा-या जी.जे.०३-ए.पी. २७०७ क्रमांकांच्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. त्यामध्ये कारमधील महिला, पुरुष व मुलगी जागीच ठार झाले. तर महिलेसह २ लहान मुले गंभीर जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, दसरखेड ग्रामीणचे पोलिस कर्मचारी, डॉ. सुभाष तलरेजा, संतोष तलरेजा, महेंद्र तलरेजा, राजपाल यांच्यासह सिंधी बांधव घटनास्थळी दाखल झाले. दोन मुलांना उपचारार्थ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात तर महिलेला अकोला येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. अपघातातील मृतक व जखमींची ओळख अद्याप पटली नाही. मलकापूर ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळावरून ट्रकने पोबारा केला.

Web Title: Three seriously injured in truck-car crash Three families of Sindhi community in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात