जिल्ह्यात गोवरची एंट्री, तीन बालके पॉझिटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

By भगवान वानखेडे | Published: December 1, 2022 06:04 PM2022-12-01T18:04:33+5:302022-12-01T18:05:10+5:30

बुलढाणा जिल्ह्यात गोवरमुळे तीन मुले पॉझीटिव्ह आढळली आहेत. 

Three children have been found positive for measles in Buldhana district | जिल्ह्यात गोवरची एंट्री, तीन बालके पॉझिटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात गोवरची एंट्री, तीन बालके पॉझिटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

googlenewsNext

बुलढाणा : राज्यातील नागरिकांची चिंता वाढविणारा गोवर आजाराने बुलढाणा जिल्ह्यातही एंट्री केली आहे. आठ संदिग्ध रुग्णांपैकी पाच रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून,त्यापैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यात साथीच्या आजाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. गोवरसोबतच हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तर आता जिल्ह्यात गोवर रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका कामाला लागले आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षणात आठ गोवरचे संदिग्ध रुग्ण आढळले होते. या संदिग्ध रुग्णांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये तीन बालके पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एक बुलढाण्यातील तर दोन देऊळगाव राजातील
पॉझिटिव्ह आलेल्या तीन बालकांपैकी एक आठ वर्षीय मुलगा बुलढाण्यातील असून, देऊळगाव राजा तील एक मुलगा १२ वर्षाचा तर त्याचीच १० वर्षीय बहिण गोवर पॉझिटिव्ह आली आहे.

पाच किलो मीटर अंतरातील बालकांचे सर्वेक्षण
गोवर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या घरापासून पाच किलो मीटर अंतरात येणाऱ्या घरांमधील बालकांचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरु आहे. सोबतच व्हीटामीन ‘ए’ दिले जात असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी यांनी दिली.

  

Web Title: Three children have been found positive for measles in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.