शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

लोणार : पुरातन विभागाचे दुर्लक्ष.

मयुर गोलेच्छा / लोणार
पुरातन सर्वेक्षण विभागाचे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असलेल्या लोणार शहरातील पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील पुरातन स्मारके घाणीच्या विळख्यात आहेत. त्यामुळे स्मारकांचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले आहे.
येथे पुरातन विभागाचे ३६ लहानमोठे राष्ट्रीय संरक्षीत स्मारके असल्यामुळे याठिकाणी पुरातन विभागाच्या उपविभागीय कार्यालयाची स्थापना झालेली आहे. शहरातील पुरातन स्मारकांना प्राचीन वैभव असून, ही संरक्षीत स्मारक सुंदर, नक्षीकाम झालेली असून, सर्व मंदिरेही अजिंठा, वेरुळप्रमाणे हेमाडपंथी आहेत. ये थील हेमाडपंथी मंदिराचे जतन व संवर्धव व्हावे या उद्देशाने केंद्रशासनाने भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असून सुद्धा मंदिराची दुरावस्थाच आहे. मंदिराच्या अवशेषाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. लोणार सरोवर व शहरातील पर्यटन स्थळांना विकसीत करण्यासाठी शहरात कॅनडा येथील तज्ञ अभियंते दाखल झाले असून, त्यांनी या मंदिराच्या दुरावस् थेविषयी खंत व्यक्त केली. शहरातील अद्भुत कलाकृतीचा नमुना असलेल्या दै त्यसुदन मंदिर, अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, प्राचीन लिंबी बारव, धारातिर्थ, पाप हरेश्‍वर मंदिर याठिकाणी सुद्धा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी चौकदार नसल्यामुळे त्याठिकाणी गुटखा पुड्या, प्लास्टीकच्या पिशव्या याचाही स्तर साचत आहे. धारातिर्थ परिसरात आंघोळ करतांना साबन, शॉम्पु आदी वस्तु वापरण्यास तसेच कपडे धुण्यास प्रतिबंध असल्याचे फलक लावण्यात आले असून सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्या जात आहे. धारातिर्थ परिसरात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, अशी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. परंतु याकडे दुर्लक्षच होत आहे. जागतीक किर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या पुरातन वास्तुकडे विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुरातन वास्तुचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त होवून पर्यटन नगरीचे वैभव लोप पावल्याशिवाय राहणार नाही.