शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या दिवसांत कोटींची उलाढाल

By admin | Updated: October 26, 2014 23:56 IST

बुलडाणा शहरात ३0 लाखांचे फटाके फोडले, सराफात उलाढाल तेजीत.

बुलडाणा : सोयाबीनने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी जेमतेम गेली. त्यामुळे दिवाळीचा व्यवसाय नोकरदार वर्गावरच अवलंबून होता. त्यातही यावर्षी नुकतीच निवडणूक झाल्याने दिवाळीच्या बाजारात बर्‍यापैकी खरेदीची रौनक दिसून आली.  दिवाळीच्या तीन दिवसांत बुलडाणा शहरात तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. यामध्ये सराफा व्यवसाय यावर्षी आघाडीवर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव तब्बल साडेतीन हजार रुपये उतरल्याने सराफा बाजार तेजीत होता. बुलडाण्याचा सराफा बाजार फार प्रसिद्ध नसला तरी नोकरदार वर्ग दिवाळीला सोन्याची खरेदी हमखास करतो. लक्ष्मीपूजनाला महालक्ष्मीचे चांदीचे शिक्के मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात. यावर्षी धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला सराफा बाजार महिला-पुरुषांनी फुलून गेला होता. खामगाव येथील शुद्ध चांदी सर्वदूर प्रसिद्ध आहे. बुलडाणा येथील सराफा बाजारात खामगावची चांदी असते. यावर्षी चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याने अनेकांनी मोठी खरेदी केली. ही खरेदी भाऊबिजेच्या दिवशीही सुरू असल्याचे बाजारपेठेत दिसून आले. *झेंडूच्या फुलांचा रंग फिका दिवाळी सणाच्या मंगलमय वातावरणाला झेंडूच्या फुलांनी वेगळीच झळाळी येते. आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे घराला तोरण हे दिवाळीचे खास वैशिष्ट्य. मात्र, यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन वाढल्यामुळे कवडीमोल भाव मिळाला. यावर्षी पाऊस उशिरा आला तरी झेंडूचे उत्पादन भरपूर झाले. आवक जादा झाल्याने शेतकर्‍यांना अखेर कवडीमोल भावाने विक्री करावी लागली. लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी तर शेतकर्‍यांना उरलेली फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली. *३0 लाखांचे उडाले फटाकेदिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन झाले की, फटाके उडविण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजनाच्या अवघ्या चार तासांत नागरिकांनी ३0 लाख रु पयांच्या फटाक्याची आतषबाजी केली. बुलडाणा शहरात यावर्षी फटाक्यांची ४१ दुकाने लागली होती. यावर्षी मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांबरोबरच शोभिवंत फटाक्यालाही मोठी मागणी होती. याशिवाय गरीब, शेतकरी-शेतमजुरांसाठी नेहमीचे हलके व कमी किंमतीच्या फटाक्यांचीसुद्धा बर्‍यापैकी विक्री झाली.