भटकंती करणाऱ्या पीडितेवर अत्याचार, अज्ञाताच्या कुकृत्यामुळे पीडिता सात महिन्यांची गर्भवती
By सदानंद सिरसाट | Updated: November 30, 2023 19:56 IST2023-11-30T19:53:52+5:302023-11-30T19:56:02+5:30
याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

भटकंती करणाऱ्या पीडितेवर अत्याचार, अज्ञाताच्या कुकृत्यामुळे पीडिता सात महिन्यांची गर्भवती
खामगाव (बुलढाणा) : अज्ञात नराधमाने केलेल्या कुकृत्यामुळे भटकंती करणारी १६ वर्षीय पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीतून उघड झाला आहे. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील गौलखेड येथील पोलिस पाटील यांनी भटकंती करणाऱ्या अनोळखी पीडितेस शेगाव ग्रामीण पोलिसात दाखल केले. बालन्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तिला बुलढाणा येथील सखी वनस्टाॅप सेंटर येथे दाखल केले. तिची वैद्यकीय तपासणी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. त्यामध्ये ती २९ आठवड्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तिचे वय साडेसोळा वर्षेच आढळून आले. रुग्णालयाच्या प्रमाणपत्रानुसार तिच्यावर अज्ञात नराधमाने अत्याचार करून गौलखेड हद्दीत सोडून दिल्याचेही माहिती पुढे आली. त्यावरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी भादंविच्या विविध कलमांसह पोक्साे सहकलम ४,६,१२ पोक्साेअंतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत.