माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात

By संदीप वानखेडे | Updated: October 7, 2023 12:57 IST2023-10-07T12:57:05+5:302023-10-07T12:57:55+5:30

कुरणखेड जवळ बसने दिली समाेरून धडक 

Terrible accident of former MLA Vijayraj Shinde's vehicle | माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात

माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात

बुलढाणा : भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कारला समाेरुन येणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकाेला येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना ७ ऑक्टाेबर राेजी सकाळी अकाेला ते अमरावती रस्त्यावर कुरणखेड गावाजवळ घडली. 

माजी आमदार विजयराज शिंदे हे अमरावती येथे भाजप नेते अनिल बाेंडे यांना भेटण्यासाठी ७ ऑक्टाेबर राेजी कार क्र.एमएच २८ एएन २७५७ ने येथे जात हाेते. दरम्यान, कुरणखेड गावाजळ त्यांच्या कारला समाेरुन येणाऱ्या अकाेला ते कारंजा बसने समाेरासमाेर धडक दिली. यामध्ये विजयराज शिंदे हे जखमी झाले. अपघातानंतर जखमी झालेल्या विजयराज शिंदे यांना अकाेला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Terrible accident of former MLA Vijayraj Shinde's vehicle