गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाकडून वाहनातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By निलेश जोशी | Updated: November 7, 2023 19:03 IST2023-11-07T18:55:17+5:302023-11-07T19:03:28+5:30

राजूर घाटातील बालाजी मंदीरालगत वाहनातच केला अत्याचार

Teacher-disciple relationship blackened, teacher's abuse of minor girl in buldhana | गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाकडून वाहनातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाकडून वाहनातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बुलढाणा : गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाण्यात समोर आली असून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने त्याच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवरच अत्याचर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी आरोपी शिक्षकास ६ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली आहे.सतीश विक्रम मोरे (रा. बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील एका तालुक्यातील छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने ती बुलढाण्यामध्ये आली होती. या मुलीच्या जुन्या अेाळखीचा गैरफायदा घेत तथा पीडितेचे कपडे बदलतांनाचे फोटो समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देत या शिक्षकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शिक्षणासाठी ही अल्पवयीन मुलगी बुलढाणा शहरात आली असता सप्टेंबर महिन्यात आपल्या वाहनाद्वारे आरोपी शिक्षकाने मुलीला एक दिवस रस्त्यातच गाठले. सोबतच आपल्या वाहनाद्वारे राजूर घाटातील बालाजी मंदीरालगत नेले. तेथे वाहनातच तिला तिचे कपडे बदलतांचे फोटो समाजमाध्यमावर तथा शाळेतील मुलांना दाखविण्याची धमकी देत सतीश विक्रम मोरे (४१) याने अवघ्या १३ वर्षीच्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान या घटनाक्रमानंतर पुन्हा पाच ते सात दिवसांनी आरोपी शिक्षकाने मुलीला चिखली मार्गावरील एका सुनसान जागी त्याच्याच वाहनाद्वारे नेले. तेथेही तिच्यावर अत्याचार केला. सातत्याने होत असलेल्या या प्रकारामुळे पीडित मुलीने तिच्या मैत्रीनीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्या मैत्रीणीने तिच्या कुटुंबियांना सर्व हकीगत सांगितल. त्यानंतर प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर पोलिसांत तक्रार दिली.

त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकास मध्यरात्री अटक केली आहे. सोबतच ज्या वाहनात हे कृत्य आरोपीने केले ते वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी शिक्षक हा बुलढाणा तालुक्याला लागून असलेल्या एका तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी बलात्कारासह, पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी हे करीत आहेत.

Web Title: Teacher-disciple relationship blackened, teacher's abuse of minor girl in buldhana