टँकर व ट्रेलरची धडक;आग लागल्याने दोन्ही चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 04:06 PM2022-04-05T16:06:46+5:302022-04-05T16:07:22+5:30

Accident News : चांदुर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला.

Tanker and trailer hit; fire kills both drivers | टँकर व ट्रेलरची धडक;आग लागल्याने दोन्ही चालक ठार

टँकर व ट्रेलरची धडक;आग लागल्याने दोन्ही चालक ठार

Next

 मलकापुर (बुलडाणा) : नॅशनल हायवे क्रमांक सहावर वडनेर (भोलजी) नजीक टँकर व ट्रेलर वाहनांमध्ये समोरा समोर धडक झाली. दोन्ही वाहनाला आग लागल्याने दोन्ही चालक घटनास्थळीच जळून ठार झाल्याची घटना ५ एप्रिल रोजी पहाटे घडली.  
     चांदुर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला. अपघातानंतर या दोन्ही वाहनांना आग लागली. मलकापूरकडून नांदुराकडे जाणारे जी.जे.  ०४ ए डब्लू २१९१ क्रमांकाचे टँकर व नांदुराकडून मलकापूरकडे जाणारा आर जे ०९ जी.बी. १५०३ क्रमांकाचे ट्रेलरची समोरासमोर धडक लागली. दोन्ही वाहनांना आग ट्रेलर व टँकरचा चालकांचा कॅबिनमध्ये जळाल्याने मृत्यू झाला.

Web Title: Tanker and trailer hit; fire kills both drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.