शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘श्वेता महाले यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करा!’

By admin | Updated: July 14, 2017 00:46 IST

जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांना धक्काबुक्की करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीनेकरण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांना धक्काबुक्की करणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत १३ जुलै रोजी चिखली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, या निवेदनात शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली; मात्र राजकीय हेतूने या कर्जमाफी विरोधात कांगावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार आंदोलनाचा फार्स १२ जुलै रोजी बुलडाणा येथे केला, तर या आंदोलनाच्या नावाखाली चाललेल्या नाटकाचे पितळ उघडे पाडण्यासाठी भाजपाच्या श्वेता महाले यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिआंदोलन पुकारले. लोकशाही मार्गाने व शांततामय पद्धतीने भूमिका मांडत असताना काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी श्वेता महाले यांना धक्काबुक्की करून त्यांचे मंगळसूत्रसुद्धा तोडले असल्याचे नमूद करून काँग्रेस पक्षाकडून दंडलीचा वापर करून महाले यांच्याशी केलेली वागणूक असभ्य व अशोभनीय आहे. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकिकाला कमीपणा आणणारी असल्याचा आरोप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला असून, याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंजाबराव धनवे यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे. यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गोपाल देव्हडे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडगे, शे.अनिस, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विजय नकवाल, गजानन भुसारी, आयुष कोठारी, चेतन देशमुख, संतोष काळे, विक्की हरपाळे, अनमोल ढोरे, उदय भुसारी, रमेश आकाळ, जय बोंद्रे, अशोक अंभोरे, आकाश महाजन, विजय वाळेकर, आकाश चुनावाले आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.