शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सुतळी बॉम्बप्रकरणी संशयीत आरोपीस अटक

By admin | Updated: January 14, 2015 23:49 IST

मातोळा तालुक्यातील जाळपोळप्रकरण; आरोपींस १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी.

धामणगाव बढे (बुलडाणा) : येथे ३ जानेवारीच्या पहाटे झालेल्या वाहन जाळपोळप्रकरणी संशयित आरोपी म्हणून एका युवकास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन जाळपोळप्रकरणी धामणगाव बढे येथील युवक मंगेश अरुण शहाणे (वय २२) यास १३ जानेवारीच्या रात्री संशयीत आरोपी म्हणून कलम ४३५ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. या युवकास १४ जानेवारी रोजी पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धा.बढे येथे तीन जानेवारीच्या सकाळी परवेज अबुबकर पटेल यांची स्कार्पिओ गाडी, दुचाकी वाहन जाळण्यात आले होते तर त्यांच्या घरासमोर जिवंत सुतळी बॉम्ब सापडला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तर गावात श्‍वान पथक, बॉम्ब शोधक पथक तथा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या भेटीमुळे गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर येत्या १0 दिवसांपासून मात्र पोलीस तपासाच्या बाबतीत अंधारात चाचपडत असल्याचे जाणवते. आता सदरहु युवकास संशयीत आरोपी म्हणून अटक केल्यामुळे काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.