शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जनभावना पाहता सर्वेक्षण अहवाल पॉझिटिव्ह असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

जालना खामगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न गेली ११० वर्ष प्रलंबित आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून तसेच सर्व पक्षीय प्रयत्नातून यासाठी ...

जालना खामगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न गेली ११० वर्ष प्रलंबित आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून तसेच सर्व पक्षीय प्रयत्नातून यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. त्याचेच फलित म्हणून रेल्वेने या मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ जानेवारीपासून ते सुरू झाले आहे. या पथकाने ६ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे भेट दिली. यावेळी तहसीलदार सुनील सावंत, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष नाझेर काजी, विविध क्षेत्रातील नागरिक, नगरसेवक उपस्थित होते.

प्रारंभी पथक प्रमुख एस. सी. जैन यांनी उपस्थिताना रेल्वे मार्ग का आवश्यक आहे, याबाबत मत प्रदर्शन करण्याची संधी दिली. त्यामुळे उपस्थितांपैकी बोलणाऱ्या प्रत्येकाने एक मुद्दा घेऊन रेल्वेमार्ग गरजेचा का? हे पटवून सांगितले. त्यानुषंगाने जैन यांनीही जनभावना पाहता त्यांचा अहवालही सकारात्मक राहील, असे संकेत दिले.

पथकात जैन यांच्या समवेत ट्रॅफिक इन्स्पेक्टर रवी गुजराल, मुकेश लाल, सिनियर सेक्शन इंजिनियर दिनेश बोरसे, अजय खनके यांचा समावेश होता. चिखली येथील रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी डॉ. किशोर वळसे, रेणुकादास मुळे यांचीही यावेळी उपस्थिती होती. रेल्वेच्या या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कृषी माल वाहतुकीची माहिती जाणून घेतली.

काजी यांनी दिला वासनिक अहवालाचा हवाला

माजी नगराध्यक्ष नाझेर काजी यांनी पथकासमोर १९८२ मध्ये याच रेल्वे मार्गासंदर्भात वासनिक समितीने सरकारला दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करून त्याची एक प्रत जैन यांना दिली. त्याच बरोबर मागील काळात रेल्वेला गरज वाटत नसलेला हा मार्ग आज किती गरजेचा आहे, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट केले.

समृद्धीची स्मार्ट सिटी महत्त्वाची

मुंबई नागपूर या स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत माळ सावरगाव येथे होणाऱ्या स्मार्ट सिटीचा उल्लेख यावेळी झाला. स्मार्ट सिटीमुळे या भागात अनेक उद्योग व्यवसाय येणाऱ्या काळात उभारले जाणार आहेत. यात विशेष करून कृषीवर आधारित उद्योग, व्यवसाय असल्याने कृषी मालाची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार आहे. जालना येथील ड्राय पोर्ट याच रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असल्याने जगभरात कृषी माल पाठवला जाऊ शकणार आहे.