शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता सुटेना!

By admin | Updated: April 26, 2017 00:59 IST

पाच वर्षांपासून रखडला लिलाव : विरोधी पक्षाचा तिढा कायम

खामगाव: नगरपालिका इमारतीनजीक आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे चित्र दिसून आहे. गेल्या पाच वर्षांपासून तयार अवस्थेत असलेल्या या व्यापारी संकुलाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असून, निर्मितीपासूनच ‘विरोधी’ पक्षाच्या रडारवर हे व्यापारी संकुल सापडले आहे. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. खामगाव नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय वास्तुला लागूनच पालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यात आले. आयडीएसएमटी योजनेंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत मंजुरी मिळालेल्या या संकुलातील २९ गाळ्यांचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पुर्णत्वास आले. त्याचवेळी संबंधित कंत्राटदाराकडून या व्यापारी संकुलाचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले; मात्र या व्यापारी संकुलाच्या लिलावाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या या व्यापारी संकुलाचा लिलाव रखडला आहे. या व्यापारी संकुलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलटून-पालटून राजकीय ‘खेळ’ रंगत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, लक्षावधी रुपयांच्या कराचेही नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा खर्च!खामगाव नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा एक भाग म्हणून २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी सुंकलाच्या लिलावाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विरोधासाठी राजकारण!व्यापारी संकुलाच्या निर्मितीपासूनच विरोधी पक्षाकडून या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले जात आहे. पालिकेत नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २७ नुसार व्यापारी संकुलाचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला; मात्र विरोधकांनी या विषयाला आक्षेप नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे या आधी सत्तेवर असलेल्या सध्याच्या विरोधकांनीसुद्धा दोन वर्षांपर्वी व्यापारी संकुल हर्रासीचा ठराव मांडला होता. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. नुकसानात भर!व्यापारी संकुलातील २९ गाळ्यांचा लिलाव लालफितशाहीत रखडला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी संकुलापासून मिळणाऱ्या भाड्यापोटी आणि करापोटीच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.