पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:26 IST2017-11-04T00:25:13+5:302017-11-04T00:26:29+5:30
खामगाव : अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घडली. पायल दिलीपसिंग पवार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी छपरीतील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देपायल दिलीपसिंग पवार असे मृत मुलीचे नावराहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घडली. पायल दिलीपसिंग पवार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी छपरीतील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायल ही गुरुवारी घरी एकटीच होती. तिची आई दुसर्या गावी गेली होती, तर वडील खामगाव येथे पेंटींग कामाकरिता आलेले होते.
तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ जा.फौ.नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.