शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराला जागा पुरेना

By admin | Updated: December 29, 2014 00:10 IST

बुलडाणा नगर परिषद आणि पाणीपुरवठा विभागाच्या इमारतीही बाजाराच्या विळख्यात.

बुलडाणा : शहरातील मेन रोड व लगतच्या प्रमुख रस्त्यावर आठवडी बाजाराचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या रविवारी या परिसरात तुंडुंब गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. जागे आभावी बाजारातील दुकान नगर परिषद आणि जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या आवारात लावले जात आहे. पोलिसांना वाढती वाहतूक व गर्दीवरील नियंत्रण सर्वस्वी अशक्य होते. आठवडी बाजाराच्या अरुंद रस्ते व वाढत्या गदीमुळे एखादे वेळी चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आठवडी बाजाराचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली आहे.या शहराचा आठवडी बाजार हा मलकापूर-चिखली या मेन रोडवर भरतो. पूर्वी लोकसंख्येच्या तुलनेत आता आठवडी बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, नगर परिषद आवार अशा अनेक ठिकाणी हा बाजार पसरला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील या रस्त्याच्या मधोमध व दुर्तफा अनेक लहान मोठय़ा व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. वाहतुकीच्या हमरस्त्यावर मधोमध दुकाने लावण्यासाठी या दिवशी प्रचंड स्पर्धा व चढाओढ असते.दुकानदार व बाजार करण्यासाठी आलेले ग्राहक यांच्या तुडूंब गर्दीमुळे आठवडी बाजाराला जत्रेचे स्वरूप येते. त्यामुळे आठवडी बाजारातून चालणेही कठीण होते. वाहतुकीचा देखील प्रश्न निर्माण होतो. येथे बर्‍यावेळा लहानसहान अपघाताच्या घटनाही घडल्या आहे. काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, मात्र त्यासाठी आवश्यक त्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. बुलढाण्याच्या आठवडी बाजाराचे अन्यत्र पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव पुढे हवेत विरली