शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या माल वाहतुक दरात प्रतिकिमी ४ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 12:23 IST

Buldhana News डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मालवाहतुकीच्या दरात ११ जानेवारीपासून प्रतिकिलोमीटर ४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.   डिझेलच्या भावात वाढ झाल्याने एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी बसने मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २१ मे २०२० पासून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतूक सेवेचे दर कमी असल्यामुळे बुलडाणा विभागासह राज्यभरातून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण मागील अनेक महिन्यांपासून डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे महामंडळाने मालवाहतूक दरात वाढ करण्याचे आदेश ११ जानेवारी रोजी काढले आहेत. कोरोना काळात सर्व प्रवासी एसटी बसेस उभ्या होत्या. परिणामी एसटीचे उत्पन्न थाबंलेले होते. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवेला सुरुवात करण्यात आली. यासाठी एक किलोमीटर मालवाहतुकीसाठी ३८ रुपये प्रतिकिलोमीटर असे दर ठरविण्यात आले होते. आता नवीन आदेशानुसार या दरात वाढ करण्यात आली आहे. यात तीन टप्पे पाडण्यात आले असून १०० किलोमीटरपर्यंत ४२ रुपये प्रतिकिलोमीटर, कमीत कमी ३ हजार ५०० रुपये दर ठरविण्यात आले आहेत. १०१ ते २५० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोमीटर आणि २५१ किलोमीटरच्या पुढे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर दर निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे आता १०० किलोमीटरच्या आत मालवाहतूक करणाºयांना प्रतिकिलोमीटर ४ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

आठ महिन्यात ६६ लाखांवर उत्पन्नमाल वाहतुकीच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाला २१ मे २०२० ते १४ जानेवारी २०२१ या जवळपास ८ महिन्यांच्या कालावधीत ६६ लाख ७७ हजार ९०३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे लॉकडाउन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागला. माल वाहतूक सेवेअंतर्गत जिल्ह्यातील सात आगारांपैकी खामगाव आगारातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. त्या पाठोपाठ चिखली, मेहकर व बुलडाणा आगारातून उच्चांकी माल वाहतूक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माल वाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा आदेश एसटी महामंडळाच्या वतीने काढण्यात आला आहे. तरीदेखील खासगी माल वाहतुकीच्या दरापेक्षा एसटी महामंडळाचे दर कमी आहेत. यामुळे व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.- ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक

टॅग्स :state transportएसटीbuldhanaबुलडाणा