शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'लालपरी' आली धावून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:19 IST

या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगराच्या १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा: राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अखेर राज्य परिवहन महामंडळाची लालपरीच धावून आली आहे. पश्चिम वºहाडातील १९० विद्यार्थी ३ मेपर्यंत स्वगृही परतणार आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगराच्या १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. आयआयटी, मेडिकल प्रवेश परीक्षा व इतर शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जातात. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ७६४ विद्यार्थी कोटा येथे अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून पालकांमधून होत होती. त्यानंतर शासनाने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत घोषणा केली होती. परंतू त्यांना आणण्याची कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडूनही कुठलीच माहिती मिळत नसल्याने पालकांची चिंता वाढली होती.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनास सादर केली. त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या. अखेर विद्यार्थ्यांना राज्य परिहवन महामंडळाच्या बसेसमधून परत आणले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना धुळे जिल्ह्यातील आगारामधून बसेस जाणार आहेत. जे विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत, त्यांना ह्या बसेसच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे.

यामध्ये अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातून १० बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यात अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार व बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांसाठी सहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीStudentविद्यार्थी