शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेरोजगारांना रोजगाराची वाट; जिल्हाभर मुद्रा योजनेच्या प्रचाराला सुरूवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:31 IST

बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत.

बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत. मुद्रा योजनेचे हे रथ गावोगावी पोहचाणार असल्याची माहिती आहे. लघु उद्योग, छोटे कारखानदार आणि दुकानदार यासह बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ मध्ये मुद्रा बँक योजना सुरू केली होती. या योजनेतून सुरूवातीला लघु उद्योजकांना १० लाखापर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात आले; परंतू वर्ष अनेक ठिकाणी मुद्रा बँक योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याचे दिसून आले. बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास नकार दिल्याने बेरोजगार युवकांनी या योजनेकडे पाठ फिरविली. मात्र आता पुन्हा शासनाने बुलडाणा जिल्ह्यात मुद्रा बँक योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी योजनेचा प्रचार करण्याचे काम हाती घेतले आहे. मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावा, यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रचार रथाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी  हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. मुद्रा बँक योजना प्रचार व प्रसार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ तयार करण्यात आले आहेत. मुद्रा योजनेचा जास्तीत जास्त लाभ सुशिक्षीत बेरोजगार युवकांना मिळावा व योजनेविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, हा उद्देश आहे.  प्रचार रथ शुभारंभवेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक गणेश चिमणकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, माहिती सहायक नीलेश तायडे, सहा. नियोजन अधिकारी सोनार, लिपिक तोमर आदी उपस्थित होते.

  याठिकाणी पोहचणार रथमुद्रा योजनेचा प्राचार, प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्रचार प्रसार रथ जात आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे मोठे गांव, आठवडी बाजारचे गाव तसेच खेडी लागून असलेल्या गावांमध्ये मुद्रा योजनेचा प्रचार करणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना