सीईटी परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 06:23 PM2020-09-30T18:23:19+5:302020-09-30T18:23:38+5:30

उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे.

ST will run Special buses for CET exams | सीईटी परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस

सीईटी परीक्षेकरीता एसटी सोडणार विशेष बसेस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात १ आॅक्टोंबर ते ९ आॅक्टोंबर या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ३० सप्टेंबर व १० आॅक्टोंबर या तारखेस विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या  उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: ST will run Special buses for CET exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.