एसटी बस-टिप्परची धडक; ७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 04:33 PM2019-09-04T16:33:55+5:302019-09-04T16:34:00+5:30

यामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

ST bus-truck strikes; 7 passengers injured | एसटी बस-टिप्परची धडक; ७ प्रवासी जखमी

एसटी बस-टिप्परची धडक; ७ प्रवासी जखमी

googlenewsNext

राहेरी बु. : वाशिम आगाराच्या नाशिक जाणाºया एस.टी.बसची व टिप्परची समोरासमोर धडक झाल्याची घटना मेहकर-औरंगाबाद रोडवरील दुसरबीड पासून जवळ असलेल्या नागझरी पुलाजवळ घडली. बुधवारी दुपारी २ वाजता हा अपघात झाला आहे. यात एकूण ७ प्रवासी जखमी झाले आहे. वाशिम वरून नाशिक जाणारी (क्र.एम एच २० बीएल ४१५०) बस व टिप्पर (क्र.एम एच २८ बी बी ८९९८) ची नागझरी पुलाजवळ धडक झाली. बसमध्ये एकूण ७० प्रवासी होते. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने दुसरबीड येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यातील काही गंभीर जखमींना जालना येथे रवाना करण्यात आले आहे. जखमींमध्ये बसचालक चंद्रधर दिलीप कांबळे यांचेसह प्रवासी गणेश पवार (२८), शेषराव झुंगरे (५३), मथुराबाई जुमडे (६०), संध्या धोंडे (५२) यांचा समावेश आहे.

Web Title: ST bus-truck strikes; 7 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.