मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 11:47 AM2021-06-06T11:47:49+5:302021-06-06T11:47:55+5:30

Speed up pre-sowing works in Buldhana District : जिल्ह्यात झालेल्या एक ते दोन पावसामुळे सध्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांनीही आता वेग घेतला आहे.

Speed up pre-sowing works in Buldhana District | मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग

मृग नक्षत्र दोन दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर आले आहे. जिल्ह्यात झालेल्या एक ते दोन पावसामुळे सध्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांनीही आता वेग घेतला आहे.
यंदा सात लाख ३५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात होते. मृग नक्षत्रात खरीप पेरणी झाली, तर येणाऱ्या उत्पादनातही चांगली वाढ होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा भर हा मृग नक्षत्रातील पेरणीवरच असतो, परंतु पावसाने साथ दिली तर. यंदा पाऊस लवकर येण्याचे चिन्ह दिसून येत असल्याने मृग नक्षत्रात पेरणी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. आता शेतकरी कोरोनाच्या या संकटाला बाजूला सारून पेरणीपूर्व कामांना लागले  आहे.


१.६५ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर
मागील महिन्यात खताच्या दरवाढीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह प्रशासनाचेही खत विक्रीकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता १ लक्ष ६५ हजार १६० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.


काय म्हणतात शेतकरी 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना आता वेग आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. 
- प्रशांत कानोडजे 

Web Title: Speed up pre-sowing works in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.