शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

ज्वारी अन् बाजरीची भाकरी महागणार, चारा पिकांकडे बळीराजाची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 06:30 IST

राज्यात ३६ हजार हेक्टरवरच लागवड, चारा पिकांकडे पाठ

ब्रह्मानंद जाधवबुलढाणा : राज्यात उन्हाळी हंगामातील ज्वारी, बाजरी पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सध्या राज्यात अवघ्या ३६ हजार ८५ हेक्टर क्षेत्रावरच उन्हाळी ज्वारी आणि बाजरीची पेरणी झाली आहे. परिणामी उत्पादन घटून ज्वारी, बाजरीची भाकरी महागण्याची शक्यता आहे.  

काही दशकांपूर्वी रब्बीसह उन्हाळी ज्वारी, बाजरीची पिके शेतकरी घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना धान्यासोबतच गुरांसाठी वैरणही उपलब्ध होत होती. सिंचनाची सोय असणारे शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला किंवा इतर नगदी पिकांकडे वळल्याने अलिकडे चारा पिकांकडे पाठ फिरवली जात आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात घट होऊन उत्पादन कमी होत आहे. परिणामी दोन्ही धान्यांचे भाव वाढत आहेत.

विभागनिहाय अशी आहे स्थिती (हेक्टरमध्ये)विभाग    ज्वारी     बाजरी अमरावती    ३३११    १५४नाशिक    १९३    ११३५१पुणे    ००    ५७१२कोल्हापूर    ००    ९८१औरंगाबाद    ५९    ९६९३लातूर    ३६०५    ७१८नागपूर    ३०३    ०७

बाजरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर राज्यात उन्हाळी बाजरीची लागवड २८ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी बाजरी पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. 

उन्हाळी ज्वारीचा ६० टक्केच पेराराज्यातील उन्हाळी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १२ हजार ५२३ हेक्टर आहे. त्यापैकी अवघ्या ६० टक्केच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात ७ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीची पेरणी आहे. 

गव्हापेक्षा ज्वारी, बाजरीला भाव  शेतकऱ्यांकडील गहू बाजार समितीमध्ये दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. तर ज्वारीला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. बाजरीही २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा