Sonaji Maharaj's yatra begins | सोनाजी महाराजांच्या यात्रेस भक्तीभावात प्रारंभ! 
सोनाजी महाराजांच्या यात्रेस भक्तीभावात प्रारंभ! 

- अझहर अली 

बुलडाणा - संपूर्ण विदर्भात प्रसिध्द संत सोनाजी महाराज यात्रात्सोवाला मोठ्या भक्ती भाव व हर्षोल्हासात सुरवात प्रारंभ झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजता महाराजांच्या रथयात्रेला सुरवात झाली. रथ आकर्षरित्या फुलाने सजविण्यात आला होता. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झाले. 

    श्री संत सोनाजी महाराज यांच्या मंदीरापासुन रात्री बारा वाजता दरम्यान सुरू झालेल्या रथ यात्रा अर्ध्या गावाची गावप्रदीक्षेणा करीत रात्री २ वाजताच्या दरम्यान प्रदीप वडोदे यांच्या घरा जवळ रथ थांबला. गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वडोदे यांच्या घराजवळुन फुलांनी सजविलेल्या रथाची गाव प्रदीक्षणेला सुरवात केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता महाराजांच्या मंदीरासमोर रथ पोहोचल्यावर साडेबारा वाजता दाहीहांडी उत्सव साजरा झाला. सोनाजी महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील हजारो भाविक संत नगरी सोनाळा येथे जमले आहे. या यात्रेला सर्व धमार्तील भाविक सहभागी होत असल्याने हि यात्रा राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिक म्हणून ओळखली जाते.

दरवर्षी सोनाजी महाराजांवर भाविकांची श्रध्दा बळकट होत असल्याने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्यासंख्येने येत आहेत. या वषीर्ही महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचे अलोट जनसागर दिसुन आला. सोनाळा येथे चिखली तालुक्यातील उत्रदा पेठ,नांदुरा तालुक्यातील निरपूर, संग्रामपुर तालुक्यातील काटेल कोलद, वडगाव वाण टूनकी, बावनबीर, टूनकी खुर्द, आदिवासी ग्राम पिंगळी येथील पालख्या पोहचल्या आहेत. यात्रेत विविध मनोरंजनाचे खेळ, विविध साहीत्यांचे दुकाणे, खेळणे, पाळणे, चित्रपट गुहे, यासह खाद्य पदाथार्चे दुकाणे देखिल सजली आहेत. 

अंबाडीची चटणी, उडदाची भाजी व भाकरीचा महाप्रसाद!
यात्रेदरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. अंबाडीची चटणी, उडदाची भाजी व भाकरी हा खास मेनू महाप्रसादाचा असतो.

Web Title: Sonaji Maharaj's yatra begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.