शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका

By admin | Updated: May 2, 2017 23:41 IST

९३९ गावांचा सहभाग : तालुकास्तरावर वर्गवारीनुसार झाले वितरण

बुलडाणा: शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचे आरोग्य समजून त्याप्रमाणे पीक घेता यावे, यासाठी मृदा आरोग्य पत्रिका वितरण अभियान सुरू आहे. जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये ६० हजार ८७५ मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, ४ लाख ४ हजार ९१२ आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. रासायनिक खतासह अन्य बाबींच्या अतिवापरामुळे खालावलेल्या जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र शासन यंदापासून ‘मृदा आरोग्य पत्रिका" अभियान राबवत आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्यांकडील शेतातील मातीचे परीक्षण करून त्याद्वारे जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ३० हजार ८९४ मातीचे नमुने तपासण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ९३९ गावांमध्ये ६२ हजार २१० माती नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६० हजार ८७५ माती नमुना परीक्षण जिल्ह्यातील प्रयोगशाळेतून करण्यात आले. या अभियानात सहभागी ४ लाख ४ हजार ९१२ शेतकऱ्यांना तालुका स्तरावर आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.अभियानात सहभागी शेतकऱ्यांचे एक हेक्टरपर्यंतचे सिमांतक शेतकरी, दोन हेक्टरपर्यंतचे लहान शेतकरी, पाच हेक्टरपर्यंतचे अर्धमध्यम शेतकरी, दहा हेक्टरपर्यंतचे मध्यम व दहा हेक्टरपेक्षा जास्ती क्षेत्र असलेले मोठे शेतकरी अशी वर्गवारी करण्यात आली. या वर्गवारीनुसार मृदा आरोग्य अभियानातून मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.९३९ गावांचा सहभागमृद आरोग्य पत्रिका वितरण अभियानात जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये तेराही तालुक्यातील ९३९ गावांनी सहभाग घेतला. यात बुलडाणा तालुक्यातील ६६, चिखली १०७, मोताळा ८०, मलकापूर ४१, खामगाव १२२, शेगाव ४३, नांदुरा ६०, ज.जमोद ६८, संग्रामपूर ६६, मेहकर ११२, लोणार ६०, दे.राजा ४० आणि सिंदखेडराजा तालुक्यातील ७४ गाव अभियानात सहभागी झाले होते.