शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेगावातील लहान मैदाने गायब!

By admin | Updated: May 12, 2014 22:36 IST

वाढत्या अपार्टमेंट संस्कृतीचा परिणाम

शेगाव : शहरातील वाढत्या अपार्टमेंट व प्लॉटच्या वाढत्या संख्येमुळे छोटी छोटी मैदाने गायब होवू लागली आहेत. जी मैदानाने आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. परिणामी घरासमोरील रस्तेच चिमुकल्यांसाठी खेळपट्टी झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि आयपीएलची धुश्मचक्री सध्या सुरु आहे. मामाचे गाव हरपलेल्या मुलांना आपल्या आवडी आता घरातच शोधत बसावे लागत आहे. टिव्ही समोर तासनतास बसलेल्या मुलांना कंटाळा आला की आपला आवडता खेळ क्रिकेटखेळावे वाटते. मात्र शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने नाईलाजाने मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. क्रिकेट असो वा फुटबॉल हे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळले जात आहेत. रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड देत सक्तीने कॉम्प्युटर गेम खेळावे लागते. सुटीमध्ये खेळायला कुठे जात? असा प्रश्न घेवून लोकमतने बालमित्रांना विचारले त्यामध्ये २0 टक्के बालमित्र बागेमध्ये, ३0 टक्के रस्त्यावर आणि केवळ २0 ट.क्के मैदानावर जात असल्याचे दिसून आले आहे. मातीमध्ये खेळतांना पडणे, खरचटणे, त्यातून शिकण्याचा अनुभव मिळणे आता विरळच त्यामुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवरील दुपारी किंवा रात्री वाहनांची गर्दी कमी असली की, खेळायचे असा चिमुकल्यांचा सुटीतील दिनक्रम बनू लागला आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे चिमुकल्यांचा ओढा मैदानी खेळ खेळण्याकडे वाढत आहे. सुमारे ५0 ट.क्के मुला-मुलींना मैदानी खेळ खेळायला आवडत असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, क्रिकेट, फुटबॉल, तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे. परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे. मैदानात खेळणे मुलांचा हक्क जसे प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. पण शहरात मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलीचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. नाईलाजाने कॉलनीच्या कोपर्‍यात घरासमोरील रस्त्यावर मुलांना जीव धोक्यात घेवून खेळावे लागत आहे. शहरात अजुनही बोटावर मोजता येईल एवढी मोठी मैदाने तग धरुन आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व सामान्य मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यास दयावे. काही मैदाने शहरात आहेत ती न.प.ने त्याचा विकास करावा. बुध्दीबळ, कॅरम खेळू या दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा पालक मुलांना बैठे खेळ खेळायला सांगतात सद्या चिमुकल्यांना बैठय़ा खेळांमध्ये सर्वात जास्त बुध्दीबळ आणि कॅरम खेळायला आवडते. तर काही वर्षापुर्वी आवडते असलेले पत्ते आणि नवा व्यापार्‍यासारखे खेळी अनेक मुले-मुली आजही तितक्याच आवडीने खेळतात. सापशिडी काहीप्रमाणात हरवत असून त्याची जागा वैज्ञानिक आणि बौध्दीक खेळांनी घेतल्याचे दिसून आले आहे. कॉम्प्युटर वेड मैदानावर जाऊन मातीत खेळणे रस्त्यावर किंवा बागेत जाऊन धिंगाणा घालण्यापेक्षा घरात बसून कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्याकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचा कल आहे. कॉम्प्युटर गेम्स येण्यापुर्वी व्हिडीओ गेम्स मोठय़ा प्रमाणात खेळले जात होते. त्यामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे लहान मुलांना चष्मा हा फार कमी वयात लागतो हे प्रमाण ३0 टक्के मुलांना झाल्याचे आढळते. शाहेत विद्यार्थ्यांना डोळेच्या आजाराने अभ्यास लक्ष विचलीत होत आहेत. हे विशेष !