तीन अपघातांत सहा जखमी
By Admin | Updated: November 9, 2014 23:21 IST2014-11-09T23:21:29+5:302014-11-09T23:21:29+5:30
खामगावसह शेगावात अपघात.

तीन अपघातांत सहा जखमी
खामगाव (बुलडाणा) : वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये सहा जण जखमी झाले. या घटना आज ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडल्या. शेगाव येथील प्रकाश जमनादास सावणा (वय ५५) व सरला लालचंद चांडक (वय ३८) रा.एकतानगर बुलडाणा यांना मालवाहू मेटॅडोरने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना खामगाव ते शेगाव रस्त्यावर जयपूर लांडे शिवारात हनुमान मंदिरनजीक घडली. दुसर्या घटनेत प्रकाश काशीनाथ चव्हाण (वय ५९, रा.वाकूड) व शिवचरण पांडुरंग साळुंके (वय ६0) हे खामगाव ते नांदुरा रस् त्यावरील गो.से. महाविद्यालयानजीक अपघातात जखमी झाले. तिसर्या घटनेत पंकज गजानन ठोसर (वय १७, रा. अमृतनगर, खामगाव) व राहुल पंजाबराव सिसोदे (वय ३७) हे एमआयडीसीनजीक झालेल्या अपघातात जखमी झाले. अ पघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात आणण्या त आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून अकोला येथे हलविण्यात आले.