शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंद; तरीही दारूची अवैध विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:12 IST

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : जानेफळ परिसरात नियमाची पायमल्ली!

जानेफळ: न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य महामार्गापासून ५०० मीटरवर असलेले बिअर बार, दारूची दुकाने वाइन शॉप बंद करण्यात आल्याने सर्व दारूबंदीचे वातावरण तयार झाले; मात्र तरीही जानेफळ परिसरात वेगवेगळी शक्कल लढवून मोठ्या प्रमाणावर दारू विक्री सुरू आहे. याला पोलीस व उत्पादन शुक्ल विभागाचे अशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जानेफळ व खेडे परिसरात असे चित्र आता दिसून येत आहे. लग्नसराई असल्यामुळे दारूबंदीच्या काळातही दारूचा महापूर वाहात असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाद- विवादाच्या घटना घडत आहे. गावात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असताना ही दारू येते कोठून, याचा शोध घेण्याऐवजी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे जानेफळ गावात दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ही दारू येते कोठून असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या गल्ली बोळात खुलेआम देशी तसेच विदेशी आणि हातभट्टीची दारू विक्र ी केल्या जात आहे. विशेष म्हणजे ही दारू दामदुप्पट दराने विकल्या जात आहे. हातभट्टीच्या दारूचे भाव तर तिपटीने वाढल्याचे सांगण्यात येते. लग्नसराई असल्यामुळे लग्नसाठी दारूचा पुरवठा करणारे स्वतंत्र लोक असून, पिणाऱ्यांची ते व्यवस्था करून देतात. या दारूमुळे लग्नात विघ्न आणल्या जात असून, पोलीस यंत्रणेचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. अवैध व्यवसाय वाढलेजानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्रीपाठोपाठ अवैध व्यवसाय वाढले आहेत. या पोली स्टेशन अंतर्गत एकूण ४८ गावे असून, या पोलीस स्टेशनला ठाणेदार मोरे रुजू झाल्यापासून अवैध व्यवसायांना खुलेआम मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळे वरली, जुगार, तासपत्ता अशा प्रकारच्या व्यवसायांना ऊत आला आहे. या मोबदल्यात पोलिसांना लाखो रुपयांची माया मिळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करतात.