शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्य सरकारचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या; सणादिवशीच मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:01 IST

Maharashtra Farmer Suicide: युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.

Buldhana Farmer Suicide: राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुणाने सुसाईड नोट लिहीत मृत्यूला कवटाळल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत असल्याचं नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख या नोटमध्ये आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील शिवनी आरमाळ शिवारात कायमच पाण्याची चणचण जाणवते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावे, अशी नागरे यांची मागणी होती. विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य न करण्यात आल्याने अखेर या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपलं जीवन संपवलं.

"पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि..."

कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की, "आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. परंतु तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो... स्वतः शून्य झालो."

दरम्यान, आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आवड असलेला आणि राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरन्वित केलेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र