शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र समितीकडून वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 9:32 PM

मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला.

ठळक मुद्देबुलडाणा जात पडताळणी समितीने दिला जात वैधतेचा निकालशिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाची लहर

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला.  शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या निनादात या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचे बलई सुतार जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा (दोन विरुद्ध एक) निर्वाळा  अकोला विभागीय जात पडताळणी समितीने ३१ डिसेंबर २०१५ ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड.साहेबराव सरदार यांच्या तक्रारीवरुन हा निकाल लागला होता. या निर्णयास आमदार संजय रायमुलकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने २३ मार्च २०१७ ला याबाबत आदेश दिला की, हे प्रकरण पूनश्च जात पडताळणी समितीकडे पाठवून सहा महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान बुलडाणा येथे जात पडताळणी समिती कार्यालय असल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी जात प्रमाणपत्र तपासणीसाठी पुराव्यासह जमा केले. १० आॅक्टोबर २०१७ ला या समितीने (त्रिसदस्यीय समिती) आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला. हे पत्र सोमवारी पोष्टाने आमदार रायमुलकर यांना मिळाले. त्यानंतर आमदार संजय रायमुलकर यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे घरी धाव घेतली. तर स्थानिक शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना कार्यालयासमोरील जल्लोषात उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, सभापती माधवराव जाधव, पं.स.सभापती जया कैलास खंडारे, उपसभापती बबनराव तुपे, जि.प.सदस्य आशिष रहाटे, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, पाणीपुरवठा सभापती ओम सौभागे, अर्थ व नियोजन सभापती तौफीक कुरेशी यांच्यासह शिवसैनिक हजर होते. यानंतर आ.संजय रायमुलकर यांच्या विजयाबद्दल शहरातील चौकाचौकात फटाके फोडण्यात आले. 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र