शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पाणी वाटपावरून बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:26 AM

नांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली.

ठळक मुद्देनळगंगा प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना मिळणार पाणी रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली. सरतेशेवटी तीन पाणी पाळ्यांवर सर्वांचे एकमत झाले.प्रकल्पाव्दारे मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतीकरीता कॅनालव्दारे पाणी उपलब्ध होत असते. धानोरा (वि.), उमाळी व नळगंगा अशा तीन सिंचन शाखाअंतर्गत ३२ पाणी वापर संस्थामार्फत वाटपाचे पाणी शेतीकरीता देण्यात येते. नळगंगा धरणात सध्या २८.७३ दलघमी जलसाठा असून त्यापैकी मार्गावरील ४.९५ दलघमी जलसाठा राखीव असून २३.९८ दलघमी जलसाठा वापरण्या योग्य आहे. यापैकी बाष्पीभवन ६.२७ दलघमी, पिण्याकरीता २.९२ दलघमी, कॅरीओव्हर ४.६0 दलघमी, तर इतर लॉसेस १.२0 दलघमी असा १४.९९ दलघमी पाणीसाठा  सध्या उपलब्ध आहे. त्यापैकी जलाशय उपसा (मोटारीव्दारे) 0.८४ दलघमी तर कॅनालव्दारे ८.१५ दलघमी जलसाठा शेतीसाइी वापरता येणार आहे. जलाशय उपसा (मोटारीव्दारे) २१0 हेक्टर तर कॅनालव्दारे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलीत करता येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत असणार्‍या नळगंगा सिंचन शाखा २४५ हे. उमाळी सिंचन शाखा ३२५ हेक्टर, तर धानोरा सिंचन शाखेला २४५ हे. क्षेत्रफळ ओलीताचे उद्दीष्ट असून दोन पाणी पाळ्या देण्यात येणार असल्याचे नळगंगा प्रकल्प प्रशासनाने सांगितले असता सर्वच ३२ पाणी वापर संस्थांनी क्षेत्रफळ कमी करून चार पाणी पाळ्या देण्याची मागणी केली. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे किमान तीन पाणी पाळ्या द्याव्यात अशी मागणी पाणीवापर संस्थांनी केली. यावर दोन्ही बाजुंनी साथक-बाधक चर्चा होवून उपलब्ध पाणी साठय़ानुसार तीन पाणी पाळ्या देण्यावर सर्वांचे एकमत झाले. सदर रब्बी हंगाम पाणी नियोजन बैठक पाटबंधारे उपविभाग मलकापूरचे उपविभागीय अधिकारी जी.आर. अग्रवाल, नळगंगापूर सिंचन शाखाधिकारी व्ही.आर. राजपूत, अभियंता आर.डी. पाटील यांचे उपस्थितीत पार पडली.

पाणी वाटपाबाबत साशंकताच !मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नळगंगा प्रकल्पाचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर असून धानोरा सिंचन शाखाधिकारी नागरे रूजू झाल्यापासून रजेवर आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांचा प्रभार अग्रवाल यांचेकडे आहे. कार्यकारी अभियंताही सध्या प्रभारी असल्याने प्रकल्पाचे पाणी वाटप, नियोजनानुसार होईल की नाही यात शंकाच आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी