परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:25 AM2017-10-16T01:25:38+5:302017-10-16T01:27:19+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 

31 percent water stock after returning! | परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

परतीच्या पावसानंतरही ३१ टक्केच जलसाठा!

googlenewsNext
ठळक मुद्दे जलसंकट : पिण्याचे पाणी, चाराटंचाई भेडसावणार!मागील चार वर्षांंत सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कमी-जास्त   प्रमाणात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या जलसाठय़ात १६८.११ दलघमी म्हणजे  ३१.५१ टक्केच जलसाठा आला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. 
बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा पेनटाकळी असे तीन  मोठे प्रकल्प आहेत, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन,  तोरणा उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यावर्षी  पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी देण्यास सुरुवात केली आहे;  मात्र मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात  परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बहुतांश नदी, नाल्यांना पूर  गेला. काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकात पुराचे पाणी  जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र जिल्ह्यातील मोठे,  मध्यम लघू प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात अल्प वाढ झाली आहे.  सद्यस्थितीत या प्रकल्पात ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध  आहे.
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी नळगंगा प्रकल्पात  ३८.८९, पेनटाकळी प्रकल्पात ३६.९२ व खडकपूर्णा प्रकल्पात  १३.२७ असा एकूण मोठय़ा प्रकल्पात २७.६१ टक्के जलसाठा  आहे, तर सात मध्यम प्रकल्पांपैकी पलढक प्रकल्प १00 टक्के,  ज्ञानगंगा प्रकल्पात ५२.२५, मस प्रकल्पात २९.४५, कोराडी  प्रकल्पात ३४.२६, मन प्रकल्पात २८.२७, तोरणा प्रकल्पात  ४0.१८ व उतावळी प्रकल्पात ३७.७0 असा एकूण सात  प्रकल्पात ४१.0६ तसेच एकूण ८१ लघू प्रकल्पांत २९.0३ टक्के  जलसाठा असा एकूण जिल्ह्यातील ९१ मोठे, मध्यम व लघू  प्रकल्पात ३१.५१ टक्के जलसाठा आला आहे. सदर जलसाठा  अल्प असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाई  भेडसावणार आहे. परतीच्या पावसामुळे नदी, नाले भरल्यामुळे  काठावरील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली  आहे; मात्र पाण्याचा अल्पसाठा असल्यामुळे उन्हाळय़ात त्रास  सहन करावा लागणार आहे.

Web Title: 31 percent water stock after returning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी