शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाचा इशारा देताच ठिंबक संचासाठी लाभार्थींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

भुमराळा येथील शेतकरी अजय देवानंद सानप व बिबी येथील शेतकरी सखाराम कुलकर्णी यांनी ठिबक व स्प्रिंकलरसाठी एका वर्षाआधी ऑनलाइन ...

भुमराळा येथील शेतकरी अजय देवानंद सानप व बिबी येथील शेतकरी सखाराम कुलकर्णी यांनी ठिबक व स्प्रिंकलरसाठी एका वर्षाआधी ऑनलाइन अर्ज केले होते. वर्ष उलटून गेले तरीही अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. हे अनुदान लकी ड्रॉ पद्धतीने होत असून, या लकी ड्रॉमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला होता. शेतकऱ्यांनी एका वर्षाअगोदर अर्ज ऑनलाइन केले होते. त्यांचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नव्हते. काही शेतकऱ्यांनी पाच ते सहा महिन्यात अनुदान घेतले होते. त्यामुळे लकी ड्रॉ पद्धतीने होत असलेल्या ठिबक सिंचन व स्प्रिंकलर योजनेमध्ये घोळ सुरू असल्याची चर्चा लोणार तालुक्यात होत होती. एखाद्या शेतकऱ्याने ऑनलाइन अर्ज सादर केला असेल आणि लकी ड्रॉ पद्धतीने त्याचा नंबर जर दोन-तीन वर्षांनी येत असेल तर त्या योजनेचा काय फायदा असा थेट प्रश्न अजय सानप व सखाराम कुलकर्णी यांनी केला होता. वर्षाअगोदर ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान मिळत नाही आणि तीन चार महिन्यात ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळते कसे असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी केला होता. अशा घोटाळेबाजी करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी व या शेतकऱ्यांचे रखडले अनुदान त्वरित द्यावे अन्यथा लोणार कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार, असा थेट इशाराच या शेतकऱ्यांनी दिल्यामुळे ३ सप्टेंबर राेजी सर्वच लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.