शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पोलिसांना पाहताच तलावावर आंघोळ करण्यास गेलेल्यांनी ठोकली धूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 2:01 PM

Khamgaon News : पोलिस आल्याचे पाहून कपडे काठावर सोडून पळाले

ठळक मुद्दे खामगावात १८ जणांवर कारवाईपोलिस आल्याचे पाहून कपडे काठावर सोडून पळाले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना लॉकडाऊनमध्ये जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या १०० पेक्षा अधिक जणांनी शनिवारी अचानक तलावावरून वाट मिळेल तिकडे धूम ठोकली. पोलिस कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी कपडे तलावाच्या काठावरच टाकून वाट मिळेल तिकडे पळून जाण्यात धन्यता मानली. यावेळी पोलिसांनी २४ वाहने जप्त केली असून, १८ जणांविरोधात कारवाई केली आहे.कोरोना संचारबंदी काळात जनुना तलावावर शहरातील काही प्रतिष्ठित आणि सामान्य नागरिक आंघोळ करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर आणि शहर पोलिसांनी एकत्रित कारवाई करण्यासाठी जनुना तलाव गाठले. यावेळी तलावात १०० पेक्षा अधिक जण आंघोळीसाठी आल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाईस सुरूवात केली. तलावावर आंघोळ करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांच्या कानावर पोलीस कारवाईची बातमी वाºयासारखी पसरली. त्यावेळी पोलिस कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी आपले कपडे तलावाच्या काठावरच सोडून पळ काढला. पोलिस कारवाईच्या धास्तीने कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग करणाºयांमध्ये एकच खळबळ उडाली.  तलावावरून धूम ठोकणाºया काहींना पोलिसांनी पाठलाग करीत ताब्यात घेतले. तर तलावाच्या मुख्य गेटवर उभी असलेली २४ दुचाकी आणि चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. १८ जणांवर कारवाईही केली. त्यामुळे तलावावर आंघोळीला जाणे अनेकांच्या अंगलट आले.

करमत नाही म्हणून पोहोचले तलावावर!- पोलिस कारवाई दरम्यान,अनेकांनी घरी करमत नाही म्हणून पोहायला येत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी काहींना पोलिसांनी चांगलाच प्रसादही दिला. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये अनेक बड्या घरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे समजते.

अर्ध नग्न अवस्थेत त्याने गाठले घर!- शनिवारी सकाळी जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने तलाववरून शहराकडे धूम ठोकली. तलावाच्या काठावर टाकलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही वेळ तलाव परिसरात लपून बसलेल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला चक्क अंडरवेअरवर घरी येण्याची वेळ आली. शहरातील जनुना तलाव ते नॅशनल हायस्कूल परिसरापर्यंत हा इसम अंडरवेअरवरच आल्याने, अनेकांसाठी पोलिस कारवाई चर्चेचा विषय बनली होती.

- कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काही जणांचा शहरात तसेच इतरत्र मुक्तसंचार आहे. शनिवारी जनुना तलावावर आंघोळीसाठी गेलेल्यांवर शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी एकत्रित कारवाई केली. यावेळी काही जण तलावावर कपडे सोडून पळून गेले. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.-हेमराजसिंह राजपूतअप्पर पोलिस अधिक्षक, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस