शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद

By admin | Updated: December 8, 2014 23:55 IST

समता परिषदेचे आवाहन : विविध संघटनांचा सहभाग.

बुलडाणा : खर्च कपातीच्या नावाखाली वित्त विभागाने सादर केलेला ओबीसी शिष्यवृत्तीचा पुनरावृत्ती फेर आढावा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांंची संपूर्ण अकराशे कोटी रुपयाची थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, एससी, एसटी विद्यार्थ्याप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांंना सर्व अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती व शुल्क परतावा देण्यात यावा, सप्टेंबर २0१0 च्या ठरावाप्रमाणे ओबीसीची जणगनना करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार ८ डिसेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एससी, एसटीप्रमाणेच ओबीसींनाही राज्य व केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र्य बजेट मिळवून गरीब ओबीसीसाठी हा प्लॅन लागू करण्यात यावा, ओबीसीसाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापन करण्यात यावे, इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील वर्ग एक ते दहावीच्या शालेय ओबीसी विद्यार्थ्यांंनासुद्धा शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा १९ सप्टेंबर २0१३ चा ओबीसींना खुल्या प्रवर्गात नोकरी बंदीचा आदेश रद्द करण्यात यावा, महाराष्ट्रातील गडचिरोली, पालघर व इतर जिल्ह्यातील ओबीसीची नोकरभरती बंद करणारा पेसा कायदा रद्द करण्यात यावा, तसेच गडचिरोलीसहित इतर जिल्ह्यात ओबीसीचे सहा टक्केपर्यंंत कमी केलेले नोकरीमधील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारले होते. विशेष म्हणजे ११ डिसेंबर २0१३ ला नागपूर विधानसभेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना लावून ओबीसी विद्यार्थ्यांंंची शिष्यवृत्ती मंजूर करा, अशी मागणी केली होती. आता सध्या परिस् िथतीत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत; परंतु अद्यापही त्यांनी ओबीसीच्या शिष्यवृत्तीबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.