शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

साहेबांचा ‘नो रिप्लाय’, राकाँ सैरभैर

By admin | Updated: September 28, 2014 00:24 IST

डॉ राजेंद्र शिंगणे एवजी रेखाताई खेडेकर यांना राकाँची उमेदवारी.

अशोक इंगळे / सिंदखेडराजासंपूर्ण बुलडाणा जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम होती ती फक्त सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात. आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनाच पक्षाची उमेदवारी मिळेल या आशेवर आजपर्यंंत कार्यकर्ते स्थिर होते; परंतु गेल्या चार दिवसात एकाही कार्यकर्त्यांंशी संपर्क न करता ते जिल्हय़ातून भूमिगत झाले. शेवटी साहेबांचा मोबाईल ह्यनो रिप्लायह्ण येत असल्याने अनेकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करून आपापला मार्ग धरला आहे. या प्रकारामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या.गेल्या २0 वर्षांंपासून आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या एकहाती सत्ता देऊन मतदारांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकला होता. जि.प., पंचायत समितीवर सत्ता मिळवित सर्वच स्तरावर त्यांची सत्ता आहे. प्रत्येक क्षेत्रा त त्यांचा कार्यकर्ता आहे. यावेळी डॉ. शिंगणेकरिता पोषक वातावरण असताना त्यांनी उमेदवारी न घे ता रेखाताई खेडेकर यांना पक्षाची उमेदवारी देऊन त्यांनी मतदारसंघातून बहिर्गमन केले. ते भाजपावर उभे राहतील, अपक्ष उभे राहतील, अशा वावड्या सकाळपर्यंंत मतदारसंघात होत्या; परंतु कार्यकर्त्यांंना कोणताही आदेश सकाळी ११ पर्यंंंत आला नाही. स्व. गणेश शिंगणे यांच्या धर्म पत्नी गौरी शिंगणे या अपक्ष अर्ज भरतील अशाही अफवांचे पीक जोमात होते; परंतु ३ वाजेपर्यंंत एकही शिंगणे कुटुंबांना अर्ज आला नाही. त्यामुळे रेखाताई खेडेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत अर्ज दाखल झाल्यानंतर दे. राजाचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, आत्माराम शेळके, माजी सभापती रियाज खाँ पठाण, वसंतराव मगर यांनी सर्मथकासह अर्ज दाखल केल्याने या पक्षात कुणाचा पायपोस राहिला नाही. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या एकछत्री कारभारला सुरुंग लागला आहे.डॉ. राजेंद्र शिंगणे जोपर्यंंंत पक्षात आहेत तोपर्यंंंत आपल्याला भवितव्य नाही म्हणून माजी आमदार तो ताराम कायंदे यांनी काही दिवसांपूर्वी सेनेत प्रवेश केला होता; पण पक्षाच्या वेगळ्या चुली पेटतील हे त्यांनी स्वबळातही पाहिले नसेल. त्यात डॉ. राजेंद्र शिंगणे काय भूमिका येथील याचाही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे सेनेत येऊनही त्यांच्या हाती भोपळाच मिळणार. त्यांनी साधी उमेदवारी अर्जही दाखल केला नाही. जे काही दिवसापूर्वी उमेदवारीच्या रेसमध्ये होते, ते सर्व बाद होऊन मतदारांसमोर नवीन चेहरे येणार येणार आहेत. भाजपाने डॉ. गणेश मान्टे यांना रिंगणात उतरवून नव्या समीकरणांची मांडणी केली आहे. यामध्ये मनसेचे विनोद वाघ यांचीही वजाबाकी ठरलेलीच आहे. काँग्रेसने यावेळी प्रदीप नागरे यांच्या रूपाने नवा चेहरा मतदारसंघात दिला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंजक झाली आहे.