शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डय़ांमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: September 25, 2014 01:15 IST

मेहकर शहरातील मुख्यरस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी.

मेहकर : शहरातील मुख्यरस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेसह वाहधारकांना कमालीचा त्रास होत असून, वाहतूक पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर डॉ.शिंदे यांच्या दवाखान्याजवळ, इंद्रप्रस्थचौक, जुने बसस्थानक, पोलिस स्टेशनसमोर, लोणार वेस, बस स्थानकासमोर यासह ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे रस्त्याची चाळणी झाली असून, रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झाला आहे. डॉ.शिंदे यांचे दवाखान्याच्या जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या घाणीमुळे तुडूंब भरल्याअसून नाल्यातून जाणारे पाणी हे मुख्य रस्त्यावर येत आहे. रस्त्यात असलेल्या खड्डयात हे पाणी साचते, त्यामुळे या रस्त्यावरुन जातांना वाहनधारकांना त्या खड्डयाचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहने खड्डयात जातात. त्यामुळे किरकोळ अपघातही होतात. रस्त्यावर येणार्‍या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी सुद्धा झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला तर कधी रस्त्यावर अनेक वाहने उभी असतात. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवितांना अडचण येऊन वाहतुकीची कोंडी होते. सर्वसामान्यांच्या या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे सतत दुर्लक्ष होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पांडे, वाघ, भराड, किटे व मुंढे या पाच पोलिसांची नेमणूक केलेली आहे. मात्र हे वाहतूक पोलिस शहरातील वर्दळ असलेल्या ठिकाणी न थांबता शहराबाहेर अवैध वाहनांच्या पाठीमागेच फिरतांना दिसतात. मात्र बायपासवर वाहतूक सुरळीत असतांना त्याठिकाणी हे वाहतूक पोलिस नित्यनियमाने हजर दिसतात. रस्त्यामधील खड्डे व पोलिसांचे सतत होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य जनता व वाहनधारक त्रस्त झाले आहेत.