मालवाहू वाहन पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 23:20 IST2018-05-19T23:20:54+5:302018-05-19T23:20:54+5:30
भरधाव वेगात असलेले एक मालवाहू वाहन पुलावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शारा-मेहकर रस्त्यावर घडली.

मालवाहू वाहन पुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू
शारा (बुलडाणा) - भरधाव वेगात असलेले एक मालवाहू वाहन पुलावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शारा-मेहकर रस्त्यावर घडली. या अपघातातील जखमींना मेहकर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील शारा-मेहकर रस्त्यावरील शारा परिसरात एका पुलाचे काम सुरू आहे.
या दरम्यान एमएच ०६ एडी ६६७७ या क्रमांकाचे मालवाहू वाहन मेहकर येथून लोणारकडे भरधाव वेगात जात होते. मात्र पुलाचे काम सुरू असल्यामुळे अंदाज न आल्याने सदर वाहन पुलावरून खाली कोसळले. त्यात वाहनातील रामभाऊ गोपाजी वाणी (वय ३५) हे जागीच ठार झाले. तर वाहन चालक व मालक संतोष शिवाजी सोनुने (वय ३०) व अनंता ज्ञानबा सानप हे गंभीर जखमी झाले. जखमींना मेहकर येथे
उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
५० फुटावरून वाहन कोसळले
या मार्गावर उपरोक्त ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. वाहन मेहकर कडून येत असताना त्या ठिकाणी अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पुलावरून ते खाली पडले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पावणे अकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहेत.