शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

खावटी अनुदान योजनेतून सधन आदिवासींना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:07 IST

Buldhana News निवडीसाठी गरिबातील गरिब, हाच निकष ठेवण्याचेही बजावण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काळात रोजगाराची समस्या निर्माण झाल्याने आदिवासी कुटुंबांसाठी सुरू केलेल्या खावटी कर्ज वाटप योजनेतून सधन आदिवासी कुटुंबासोबतच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्याचे कुटुंब वगळण्याचा आदेश शासनाने ३० सप्टेंबर रोजी दिला. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना त्यानुसार देण्यात आल्या आहेत.राज्यभरात अनुसूचित जमातींच्या कुटुंबांना मदतीसाठी खावटी कर्जवाटप योजना ९ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राबवली जात आहे.त्या निर्णयानुसार या लाभासाठी पात्र असलेल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंब, पारधी जमातीची सर्व कुटुंब, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंब, ज्यामध्ये विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिला, भूमिहिन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली कुटुंब यांच्यामधून लाभार्थींची निवड केली जाणार आहे.त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून पडताळणी होणार आहे. राज्यात या सर्व प्रकारातील मिळून ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंब असल्याची नोंद शासनाकडे आहे.त्यापैकी निवड केली जाणाºया कुटुंबाबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचाºयाचे कुटुंब, सधन आदिवासी कुटुंबांना वगळण्याचे सांगितले आहे. निवडीसाठी गरिबातील गरिब, हाच निकष ठेवण्याचेही बजावण्यात आले.

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना