शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पाण्याचा पुनर्वापर; बचतीची आवश्यकता

By admin | Updated: July 14, 2014 23:02 IST

लोकमत इनिशिएटिव्ह; थेंब महत्त्वाचा उज्ज्वल भविष्यासाठी

बुलडाणा : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या बुलडाण्यावर चार दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढवली आहे. धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. बुलडाण्यातील काही वार्डातील नागरिकांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून इतरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. पाण्याच्या पुनर्वापराचा प्रयत्न केला तर एक सुजाण नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्याबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. साधारण दर तीन वर्षांनंतर बुलडाण्यावर पाणी टंचाईची आपत्ती ओढवते. यावेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात; मात्र पाऊस सुरू झाला की, सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. बुलडाणा वाढतंय, लोकसंख्या वाढतीय; मात्र बुलडाण्यासाठी असलेली पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. सध्या उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. नगरपालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.

** बुलडाणेकरांनोलक्षात ठेवा..

खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अर्मयाद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने बुलडाणेकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. बुलडाणेकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो. आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर शॉवरखाली : १00 लिटर दाढी नळ सोडून दाढी केल्यास : १0 लिटर मग घेऊन : १ लिटर ब्रश नळ सोडून केल्यास :१0 लिटर मग घेऊन : १ लिटर कपडे नळाखाली :११६ लि. बादलीचा वापर केल्यास : ३६ लिटर मोटार पाईप वापरल्यास : १00 लि. बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर हात धुण्यासाठी नळाखाली : १0 लिटर मग घेऊन : अर्धा लिटर शौचविधी फ्लश केल्यास : २0 लिटर बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर

** सामूहिक जबाबदारी

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळांची तातडीने दुरुस्ती करा येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणार्‍या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून बुलडाण्याची पुन्हा ह्यग्रीन बुलडाणाह्ण ही ओळख निर्माण करावी.

** वैयक्तिक जबाबदारी

नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्‍वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. 'लोकमत'च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे.

** आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती 'लोकमत' कार्यालयात पाठवा. पत्ता : लोकमत जिल्हा कार्यालय, डॉ.पर्‍हाड बिल्डींग, संगम चौक, बुलडाणा ४४३00१, फोन (0७२६२) २४२६२४ (ई-मेल : lokmatbuldana@gmail.com)

- निवासी संपादक