शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

बुलडाण्यात उष्माघात कक्ष कुलुप बंद! ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आले वास्तव             

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 19:27 IST

२५ एप्रिल रोजी तर बुलडाण्यातील तापमान ४२.५ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेले असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्ष कुलुप बंद दिसून आले.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा - विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना बुलडाण्यातही उन्हाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, २५ एप्रिल रोजी तर बुलडाण्यातील तापमान ४२.५ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेले असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्ष कुलुप बंद दिसून आले. उष्माघाताचा रुग्ण आल्यास या कक्षामध्ये सुविधांचाही अभाव असल्याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनदरम्यान गुरूवारी समोर आले आहे.  विदर्भात २३ ते २९ एप्रिल या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यम ते उष्ण लहरी प्रवाहीत होत आहेत. परिणामी, बुलडाणा जिल्ह्याला लागून असलेल्या अकोल्याचेही तापमान ४६ अंशावर गेल्याने पूर्व विदर्भातील उष्णतेची लाट हळुहळु पश्चिम विदर्भातही शिरली आहे. हवामान शास्त्रानुसार उष्णतेच्या लाटेमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश नसला तरी शेजारील जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यानंतर थोडाफार फटका जिल्ह्यातही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उष्णतेच्या पृष्टभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्षाची पाहणी व चौकशी केली असता उष्माघात कक्षाला कुलुप लावलेले दिसून आले. तर उष्माघात कक्षासाठी अंतर्गत सुविधांचाही अभाव आहे. गुरूवारी बुलडाण्याचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले असतानाही दुपारच्यावेळेस उष्माघात कक्ष बंद असल्याने आरोग्य विभाग किती जागृक आहे, याचे वास्तव ‘लोकमत’ स्टिंग आपरेशनमुळे समोर आले आहे.  असे झाले स्टिंग‘लोकमत’ प्रतिनिधी गुरूवारी दुपारी १२.३० वाजतादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता उष्माघात कक्षाची विचार केली. दोन ते तीन कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर एकाने उष्माघात कक्ष कुठे आहे, ते सांगितले. परंतू उष्माघात कक्षाला कुलुप लावलेले दिसून आले. उष्माघात कक्षाच्या बाहेर उष्माघाताची चिन्ह, लक्षणे व उपचार लावलेले आढळून आले. मात्र आजुबाजुला एकही कर्मचारी त्याठिकाणी हजर दिसून आले नाही. तर दरवाजाच्या काचातून पाहिले असता कक्षात केवळ खाटांव्यतिरिक्त कुठल्याच सोयी-सुविधा दिसल्या नाही. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढले रुग्ण‘एप्रिल हीट’ने वाढले रुग्णविदर्भातील एप्रिल व मे महिन्याचा उन्हाळा तसा सर्वत्र प्रसिद्ध आहे. सध्या एप्रिल हीटने रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून येत आहे. सूर्य आग ओकत असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचाही आकडा फुगतच आहे. गुरूवारला जिल्हा समान्य रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरलेले दिसून आले.  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना केलेली आहे. सध्या रुग्ण नसल्याने ते बंद आहे. उष्माघात कक्षात लागणाºया आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. - डॉ. पी. बी. पंडित,जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTemperatureतापमान