शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाचन प्रेरणा दिनाची लागली उत्सुकता

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त शाळांमध्ये पुस्तक प्रदर्शन.

युसूफ शेख / संग्रामपूर (जि. बुलडाणा) : मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची १५ ऑक्टोबर ही जयंती. वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांंंसह पालक वर्गामध्ये सध्या त्याविषयी उत्सुकता लागली आहे. थोडक्यात ह्यवाचू आनंदेह्ण ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा होत आहे. गुरुवारी विद्यार्थी दप्तराविना शाळेत येणार असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांंंना वाचनाची आवड लागावी, हा दृष्टिकोण या दिनामागे आहे. सोबच प्रकट वाचनाला १५ ऑक्टोबरला महत्त्व देण्यात येणार असून, वाचनादरम्यान विद्यार्थ्यांंंमध्ये दिसून येणार्‍या त्रुटींच्या नोंदी घेण्यात येतील. विद्यार्थ्यांंंमध्ये वाचनकला विकसित होण्यासाठीही प्रयत्न होणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना २८ सप्टेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील शाळांनी तयारी केली आहे. सोबतच या ह्यवाचू आनंदेह्ण दिनाच्या अनुषंगाने पालकांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.अवांतर पुस्तक वाचनावर भर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंंना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बोधपर, प्रेरणादायी पुस्तके या दिवशी वाचण्यासाठी देण्यात येणार आहेत. कला, नाट्य, सिनेमा, साहित्य, विज्ञान, क्रीडाविषयक पुस्तकांचा यात समावेश राहणार आहे. पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. जगातील प्रसिद्ध लेखकांचीही ओळख विद्यार्थ्यांंंना करून देण्यात येणार आहे.