बुलडाणा : गुरुवारी सायंकाळी बुलडाणा शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धातास धुव्वाधार पाऊस झाल्याने शेतकरी जसेच नागरिकांमध्ये आनंद व्यक्त झाला; मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. रात्रीतून पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाने पुन्हा उघाड दिल्याने सर्वांचीच निराशा झाली. शुक्रवारीसुद्धा सकाळपासूनच आकाशात काळे ढग होते. तथापि, दिवसभर पावसाचे वातावरण असताना पाऊस कोठेच पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांची निराशा झाली. आज, उद्या पाऊस पडेल व तग धरून असलेल्या पिकांना जीवनदान मिळेल, या आशेवर शेतकरी पावसाची वाट पहात आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}