महिनाभरानंतर खामगाव परिसरात पाऊस

By Admin | Updated: September 4, 2015 23:54 IST2015-09-04T23:54:43+5:302015-09-04T23:54:43+5:30

सकाळी ८ वाजेपर्यंत १९.0६ मिमी पावसाची नोंद.

Rainfall in Khamgaon area after a month | महिनाभरानंतर खामगाव परिसरात पाऊस

महिनाभरानंतर खामगाव परिसरात पाऊस

खामगाव : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी शहर व परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील पिकांना संजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात ४ ऑगस्ट रोजी शहर आणि परिसरात पाऊस झाला होता. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतरच पाऊस आला. तथापि, शुक्रवारी पाऊस झाला असला तरी त्याआधीच पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. जूनमध्ये वेळेवर आलेल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी मोठय़ा आशेने पेरणी केली मात्र त्यानंतर महिनाभर पाऊस गायब झाला. यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. तर ज्यांची पेरणी राहिली होती असे शेतकरी पाऊस झाल्यानंतर दुसर्‍या पावसाची प्रतीक्षा पेरणीसाठी करीत होते. मात्र असा पाऊस न झाल्याने अनेकांना पेरणी सुध्दा करता आली नाही. निसर्गाच्या या अवकृपेमुळे यावर्षी सोयाबीन, उडीद, मुग, ज्वारी आदी पिके सुकली आहेत. ४ सप्टेंबरच्या रात्री ते सकाळी ८ वाजेपर्यंत १९.0६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.

Web Title: Rainfall in Khamgaon area after a month