सध्याची परिस्थिती पाहता, सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्याची मागणी हाेत आहे. शासनाने ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे़. जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी अर्ज केला हाेता, त्यापैकी लाॅटरी पद्धतीने केवळ ८ हजार शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणांचा लाभ मिळणार आहे. काेराेना संक्रमण वाढल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लावले हाेते. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत़. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़. त्यातच रासायनिक खते व बियाणांचे भाव वाढल्याने पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे देण्याची मागणी डोणगाव येथील सुभाष अढाव व वसंतराव मानवतकर यांनी केली आहे़.
सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST