शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गौण खनिजाचे रक्षण करणे बेततेय जिवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:55 PM

जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाया सुरु केल्या आहेत.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हयात गौण खनिज उत्खनन करण्यास मनाई आहे. असे असतानाही रात्रीच्या वेळी सर्रासपणे गौण खनिज चोरीच्या घटना घडत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला असला तरी मोटारसायकलवर गौण खनिज चोरी रोखणे अशक्य ठरत आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन नेवून, कधी मारहाण करून कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न गौण खनिज चोर्ट्याकडून होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ घटनात कर्मचाºयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.महसूल, पोलिस विभागाचे संयुक्त पथक कार्यान्वीत करून यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. तेव्हाच गौण खनिज चोरीला आळा बसू शकेल. जिल्हयातील एकही रेती घाटाचा अद्याप लिलाव झालेला नसल्याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाकडून मिळाली आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, मन, वान, नळगंगा, सिद्धगंगा या नदीपात्रातून दिवस अन रात्र टिप्पर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिजाची चोरी करून अवैध वाहतूक केली जात आहे. दिवसा नदीमधून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. रेती माफिया ट्रॅक्टर, टिप्परने अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाया सुरु केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसिलदाराकडूनही कारवाईसाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्हयात शेगाव, खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा याठिकाणी महसूल प्रशासनाने कारवाया करीत गौण खनिज माफीयांना धडा शिकवला आहे. मात्र हे सर्व करीत असताना मंडळ अधिकाºयांसह तलाठ्यांना जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावावे लागत आहे. काही ठिकाणी तहसिल कार्यालयाकडे तहसिलदारांचे एकमेव शासकीय वाहन आहे. उपलब्ध त्या वाहनाने कर्मचाºयांना कारवाईसाठी निघावे लागते. काही महिन्यापूर्वी गौण खनिज माफियांनी खुद्ध अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनाही टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला होता. तर जलंब येथे गुरुवारी रात्री मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंबमाटरगाव येथील मंडल अधिकारी संजय बापुराव देशमुख हे गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी ड्युटीवर असताना त्यांना अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना टिप्पर गाडी दिसली. टिप्पर चालकाला त्यांनी हात देवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या टिप्पर चालकाने तहसिल कार्यालयाचे गाडीला अपघात घडवून मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचे वाहन चालक संतोष सातभाकरेंनी समयसुचकता व प्रसंग सावधानता ठेवत गाडी ही रस्त्याचे बाजुला काढून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.याबाबतची तक्रार मंडल अधिकारी संजय देशमुख यांनी मध्यरात्री जलंब पोलीस स्टेशनला दिली. परंतु वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तर सदर टिप्पर वाहन चालक हा माटरगाव येथील असल्याचे समजते. उल्लेखनीय बाब म्हणजे घडलेल्या घटनेची तक्रारही मंडल अधिकारी यांनी मध्यरात्रीच जलंब पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु दुसºया दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.

मंडळ अधिकाºयाला जीवे मारण्याचा प्रयत्नजलंब : अवैधरित्या मध्यरात्री रेतीची वाहतूक करणाºया टिप्पर चालकाला हात देवून तहसीलच्या गाडीतील मंडळ अधिकाºयाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता टिप्पर चालकाने मंडळ अधिकाºयाच्या अंगावर गाडी आणुन जीवे मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री मोरगाव डिग्रस गावानजीक घडली. या घडलेल्या घटनेमुळे अधिकारी वर्गात एकाच खळबळ उडाली.

गौण खनिज चोरी रोखण्यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी जिवाचे रान करीत आहेत. प्रसंगी जीव धोक्यात घालून कारवाया करीत आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी त्यांच्यास्तरावर नियोजन केले आहे.- प्रमोदसिंह दुबे, अप्पर जिल्हाधिकारी, बुलडाणा

 

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग