शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर पांग्रा येथे वीज पुरवठ्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST

मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात ...

मलकापूर पांग्रा : येथील महावितरणचे ३३ केव्ही सबस्टेशन असले, तरी खासगी आणि कंत्राटी कामगारच येथील कारभार पाहतात. या गावात कायमस्वरूपी लाईनमन नाही. त्यामुळे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे गावकऱ्यांना वर्गणी करून खासगी लाईनमनकडून वीज पुरवठ्याची कामे करून घ्यावी लागत आहेत.

महावितरणच्या कारभाराबद्दल मलकापूर पांग्रावासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मलकापूर पांग्रा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील झाडाची छाटणी न केल्यामुळे झाडाच्या फांद्या थेट विद्युत तारांना जाऊन भिडलेल्या आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. गावामध्ये बाजार गल्लीतील रोहित्र जळाली आहे. त्या रोहित्राला दुरुस्त करण्यासाठी नेले आणि दुसरे रोहित्र आणले; परंतु तेही नादुरुस्त निघाले. त्यामुळे अर्ध्या गावातील विद्युत पुरवठा गूल आहे. याबाबत सबस्टेशनला फोन केला की कोणी फोन उचलत नाही. महावितरणच्या अभियंत्याला फोन केला की त्यांचा फोन नॉटरिचेबल असतो. त्यामुळे करावे काय असा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडला आहे. या सबस्टेशनमधून देऊळगाव कोळ, वाघाळा, झोटिंगा येथे वीजपुरवठा होतो. मलकापूर पांग्रा केंद्राला झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे जोडलेली आहेत. त्यामुळे या तिन्ही गावांत कुठेही बिघाड झाला की तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा हे रोहित्र स्वतंत्र करावे, अशी मागणी केली आहे.