शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्राचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By admin | Updated: April 26, 2017 00:16 IST

वीज उपकेंद्राला संजिवनी देणारे आ.खेडेकर : बावनकुळे यांचे प्रतिपादन

देऊळगावराजा : महाराष्ट्रात आज रोजी मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असल्याने विजेची टंचाई नाही; परंतु वीज वितरणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री अद्याप पूर्णत्वाला गेली नाही, त्यामुळे काही प्रमाणात वीज कपातीचा विषय पुढे येतो. गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या वीज उपकेंद्राचे प्रश्न विधानसभेत उचलणारे आणि मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासू आमदाराची यादीत महाराष्ट्रातील आपल्या मतदार संघातील सर्वात जास्त कामे करणारे १० आमदारापैकी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचा नाव पुढे आहे. खऱ्या अर्थाने वीज उपकेंद्राला संजिवनी देणारे आ.डॉ.खेडेकरच आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. २५ एप्रिल रोजी १३२/३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.देऊळगावराजा तालुक्यातील अंभोरा शिवारातील उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १३२/३३ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात देऊळगावराजाचे नगराध्यक्ष सुनीता रामदास शिंदे, भाजपाचे डॉ.गणेश मांटे, यादवराव भालेराव, शिवसेना शहर प्रमुख मोरेश्वर मिनासे यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी विदर्भात विजेच्याबाबत सातत्याने अन्याय होत होता, असे सांगून ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, असमतोल दूर करून दोन हजार कोटीचे अनुदान मंजूर केले. तीन लाख शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना वीज जोडणी करून दिलासा दिला. गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या या उपकेंद्राला सुरू करण्यासाठी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी शेतकरी नागरिकांच्या हितासाठी सतत पाठपुरावा करून आणि विधानसभेत विजेचा मुद्दा तारंकीत करून या वीज केंद्राची उभारणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अभ्यासू आमदारांच्या यादीत आ.डॉ.शशिकांत खेडकर यांच्या मतदार संघात सर्वात जास्त काम करणारे १० आमदारांमध्ये स्थान दिले. या वीज उपकेंद्राची उभारणी करणारे डॉ. खेडेकर खरे शिल्पकार आहे.भविष्यात १००० शेतकऱ्यांचा गट तयार करून २०० एकर सरकारी जमीन उपलब्ध करून द्या, त्यांना सौर ऊर्जाद्वारे वीज पुरवठा करण्यासाठी त्याकरिता ऊर्जा खात्याकडून विशेष निधी दिला जाईल, अशी घोषणा यावेळी केली. स्वभिमानी शेतकरी संघटनेचे उर्जामंत्र्यांना निवेदन तूर खरेदी केंद्रावर मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे ट्रक्टर आणि वाहने उभे असताना नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे स्वभिमानी शेतकरी युवा आघाडी संघटनेच्या कार्यकर्ता गजानन पाटील बंगाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. नाफेडद्वारे हमी दराने तूर खरेदी २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात आली. त्यामुळे खरेदी केंद्रावर तुरीचे ट्रक्टर उभे आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी, शेवटचा तुरीचा दाणा शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी केंद्र चालू ठेवण्याचे आश्वासन पाळावे अन्यथा १ मे रोजी पालकमंत्री यांच्या समारंभात स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात येणार आहे, असा इशारा निवेदनात देण्यात आला. याप्रसंगी स्वभिमानी शेतकरी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सतिष मोरे, गजानन पाटील बंगाळे, जितेंद्र खंदारे, गजानन मुंडे आदि शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते.