शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

फार्महाऊसमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:43 IST

Police raid on gambling in farmhouse पाच दुचाकीसह एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : ग्रामीण पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या शिरजगाव निळे येथील शेतामध्ये फार्महाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने छापा मारून पाच दुचाकीसह एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ११ आरोपींना अटक करण्यात आली.  बारावा आरोपी शेतमालक फरार झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शेगाव खामगाव रोडवरील शिरजगाव निळे शिवारात सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर रा. गांधी चौक, बारादरी, खामगाव याच्या मालकीच्या फार्महाऊसवर तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.  त्यानुसार ६ मार्च रोजी संध्याकाळी छापा टाकण्यात आला.  यावेळी नगदी ५३ हजार सातशे वीस रुपये, अकरा नग मोबाईल किंमत ४० हजार ९०० रुपये, पाच मोटरसायकल  किंमत एक लाख ८० हजार रुपये व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख ७४ हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  याबाबतची फिर्याद सरकारतर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल  गजानन दामोदर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून खामगावातील आरोपी घनश्याम माणिकलाल भुतडा (४९)  रा. जलालपुरा,  आजम खान अब्दुल रहमान खान, रा. माखणी, नसिरुद्दीन अनिसउद्दीन रा. फाटकपुरा,  शेख इसाक शेख गुलाब रा.  जुना फैल,  पुरुषोत्तम केदारमल टिबडेवाल,  रा. गांधी चौक शेगाव, पुरुषोत्तम जगन्नाथ राठी रा.  केदार नगर खामगाव,  हिंमत भगवान रोजीया, रा.  राठी प्लॉट खामगाव,  संतोष चंद्रभान नागरगोजे, चांदमारी खामगाव, गणेश नारायण मुधळकर रा. रेखा प्लॉट खामगाव,  किसन दगडू माळोदे, रा. गजानन नगर खामगाव,  गजानन सुखदेव सोनोनेे,  रा. शंकर नगर खामगाव,  सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर गांधी चौक बारादरी अशा बारा जणांविरुद्ध  महाराष्ट्र जुगार कायद्यासह  भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  बारा आरोपींपैकी जागा मालक असलेला सुरेश उर्फ अण्णा नागेश्वर हा आरोपी फरार आहे.  ११ आरोपींना अटक करण्यात आली.  अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.हे.काँ ज्ञानदेव ठाकरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShegaonशेगाव