शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षेसाठी पोलिसांचा आय वॉच

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

विशेष सॉफ्टवेअर : बटन दाबताच पीडित महिलेस सुरक्षा!

नीलेश शहाकार/बुलडाणा
राज्यात महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी पोलिसांनी आय वॉच हे नवे मोबाईल सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. लहान मुले आणि वृद्धांनाही याचा फायदा होणार आहे.
महाविद्यालयीन, शाळकरी मुली, नोकरदार महिला तसेच पर्यटक महिलांवर अ त्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. नवे सॉफ्टवेअर महिलांच्या सुरक्षेबाबत फायदेशीर ठरणारे आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पीडित महिलेस घटनास् थळाचा तसेच आरोपीचा व्हिडिओ आणि मदतीचा संदेश कळ दाबताच थेट पोलिस नियंत्रण कक्षास आणि तिच्या नातेवाईकांना पाठवता येईल. या मोबाईल अँप्लिकेशनद्वारे येणार्‍या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे.
आजकाल बहुतांश महिलांकडे स्मार्टफोन आहे. या फोनवर हे अँप्लिकेशन सहज डाऊनलोड होऊ शकते. बटन दाबताच मोबाईल फोनचा कॅमेरा ऑन होऊन चित्रीकरण सुरू होते. हे चित्रीकरण बटन दाबताच थेट नियंत्रण कक्षाकडे पोहोचेल. जीपीएसचा वापर करुन पीडित महिलेचे स्थळ आपोआप नियंत्रण कक्षास कळू शकणार आहे. यानंतर विशेष कक्षातील कर्मचारी आवश्यक ती मदत संबंधित पीडित महिलेला तातडीने देऊ शकतील. पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर या नव्या सॉफ्टवेअरची माहिती उपलब्ध आहे.