शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीचे खुलेआम उल्लंघन

By admin | Updated: September 17, 2014 01:01 IST

बुलडाणा जिल्ह्यात गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले : मानसिकता बदलण्याची गरज

बुलडाणा - सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा शहरात राजरोस वापर सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र ठोस दंडात्मक कारवाई न केल्याने प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनात अडचणी येतात. प्लास्टिकमधील विघटन न होणार्‍या रसायनामुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण झाला आहे. यामध्ये सांडपाणी निचरा करणार्‍या व्यवस्थेत अडथळे निर्माण होणे, भूगर्भजल प्रदूषित होणे असे अनेक धोके समाविष्ट आहेत. ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक यादृष्टीने जास्त धोकादायक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ मे २0११ च्या आदेशानुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे; तसेच तंबाखू, पानमसाला, गुटखा यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यास व विक्री करण्यास बंदी घातली आहे; मात्न सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी झाली नाही.परिणामी ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे नगरपालिका प्रशासन ठोस कार्यवाही करीत नसून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्नण मंडळ यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.** अशी आहे कारवाईची तरतूदप्लास्टिक निर्बंधाबाबत पर्यावरण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार तयार केलेल्या पर्यावरण संरक्षण नियम ४ नुसार ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे उत्पादन करणे, ते आयात करणे वा त्याचा पुरवठा करणे तसेच विक्री करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २000 मधील तरतुदीनुसार नगर परिषदेला ही जबाबदारी देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने कारवाई प्रस्तावित करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर पालिकेला दिले आहेत; परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उदासीन असल्यामुळे याकडे कोणीही लक्ष देत नाही.